कामगारांना 5000 दिवाळी बोनस मिळणार बांधकाम कामगार मंत्र्याकडून माहिती.

बांधकाम कामगारांना 5000 दिवाळी बोनस मिळणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.

जे बांधकाम नोंदणीकृत आहेत आणि जिवंत आहे अशा बांधकाम कामगारांना या दिवाळीसाठी 5000 दिवाळी बोनस मिळणार असल्याने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना यामुळे आर्थिक दिलासा मिळालेला आहे.

तुम्हाला देखील असा दिवाळी बोनस हवा असेल तर लगेच तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी करून घ्या.

कोणत्या कामगारांना 5000 दिवाळी बोनस मिळणार

ज्या बांधकाम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंदणी झाली आहे अशा बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. यामध्ये हा बोनस जाहीर झाल्याने बांधकाम कामगारांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे.

बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर अनेक योजनांचा लाभ मिळतो. एकूण ३२ योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळतो त्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे.

काय आहे बांधकाम कामगार दिवाळी बोनस संदर्भातील सविस्तर माहिती

बांधकाम कामगार मंत्री यांनी या दिवाळी बोनस संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. बांधकाम कामगारांना दिले जाणारे हे दिवाळी बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदान आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात असे सुमारे २८ लाखापेक्षा जास्त कामगार आहेत. या सर्व बांधकाम कामगारांना त्यांच्या बँक खात्यामध्ये हे ५ हजार सानुग्रह अनुदान जमा केले जाणार आहे.

तुमची जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली नसेल तर लगेच करून घ्या जेणे करून तुम्हाला देखील अशा प्रकारच्या योजनंचा लाभ मिळेल.

5000 दिवाळी बोनस मिळविण्यासाठी नेमके चेक काय करायचे

बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे कि बांधकाम कामगारांना 5000 दिवाळी बोनस तर मिळणार आहे परंतु यासाठी कोणती प्रोसेस करावी लागणार आहे. एखादा अर्ज सादर करावा लागणार आहे का तर नाही.

तुम्हाला फक्त महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवर जावून construction worker profile login या बटनावर क्लिक करायचे आहे.

लॉगीन केल्यावर तुमचा आधार नंबर आणि चालू मोबाईल नंबर टाकून proceed to form या बटनावर क्लिक करा.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकून लॉगीन करा.

लॉगीन झाल्यावर bank details हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करून तुमचे बँकेचे तपशील चेक करून घ्या.

अशा पद्धतीने हि प्रोसेस कशी असते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतली आहे.

Leave a Comment