mini tractor yojana मिनी ट्रॅक्टर योजना मिळणार 90 टक्के अनुदान

mini  tractor yojana मिनी  ट्रॅक्टर योजना संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया जेणे करून तुम्हाला या योजनाचा लाभ मिळू शकेल.

शेती मध्ये विविध कामासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो विशेष म्हणजे मिनी ट्रॅक्टर. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागतो या सर्व प्रकारची माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया. 

mini tractor yojana मिनी ट्रॅक्टर योजना 90 टक्के अनुदानावर 

शेतकरी बंधूंनो तुमच्याकडे तर मिनी ट्रॅक्टर असेल तर तुम्ही शेतामधील विविध कामासाठी या मिनी ट्रॅक्टरचा उपयोग करून आधुनिक पद्धतीने शेती करू शकता. 

शेतकरी बंधुनो तुम्हाला जर मिनी ट्रॅक्टर  घ्यायचे असेल तर तुम्ही शासकीय अनुदानावर सुद्धा मिनी ट्रॅक्टर घेऊ शकता त्यासाठी शासनाकडून 90 टक्के अनुदान मिळते. 

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो, अर्ज कुठे करावा लागतो. त्यासाठी काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी हे व्यक्ति असतील पात्र 

अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयसहाय्यता बचत गटांना काहीतरी उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे व तसेच त्यांचे राहणीमान बदलावे या उद्देशाने ही योजना राबविली जात आहे. 

या योजनेंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्या ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे. 

या योजनेसाठी केवळ अनुसूचित जाती नवबौद्ध घटकतील अर्जदार मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करू शकतील.

मिनी ट्रॅक्टर योजना अटी खालील प्रमाणे

  • जे स्वयंसहाय्यता बचत असणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील नागरिक असावेत.
  • स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • बचत गटातील कमीत कमी 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे गरजेचे आहे.
  • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच आवश्यक असणारे साहित्य यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा रु. 3.50 लाख इतकी असेल,
  • स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.

कोठे करावा लागणार अर्ज 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत आणि या साठी कोणत्या अटी दिलेल्या आहेत हे आपण जाणून घेतलेले आहे.

आता जाऊन घेवूयात कि या योजनेसाठी ऑनलाईन आज करण्यासठी कोठे अर्ज करावा लागतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयास तुम्हाला भेट द्यायची आहे. या कार्यालयामध्ये तुम्ही ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment