Crop Insurance new : 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार यादीत नाव पहा

Crop Insurance new : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड येणार आहे. पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत 13 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 25% अग्रीम रक्कम ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेटणार. तब्बल सहा जिल्ह्यात, नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 13 लाख शेतकऱ्यांमध्ये 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिवसात मंजूर झालेली आहे. येत्या काही दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल.

पिका विमा कधी मिळणार | Crop Insurance new

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पाठवण्याचा निर्णय होणार आहे. सांगली, पुणे, जालना, नागपूर, अमरावती, धाराशिव, अकोला, परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. सांगली आणि पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी न झाल्यामुळे 26000 शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर आहे. तसेच धाराशिव, अकोला, परभणी, अमरावती, नागपूर, जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 613 कोटी 19 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे. या सहा जिल्ह्यात 12 लाख 86 हजार 185 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. येत्या दोन दिवसात या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पाठवण्यात येणार आहे.

जळगाव आणि नगर या जिल्ह्यामध्ये सोयाबीन मका आणि बाजरी या पिकांना पिक विमा मंजूर झाला असून लवकरच कापूस आणि इतर पिकांना पिक विमा मंजूर होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर मध्ये सोयाबीन आणि मका पिकांना मान्यता मिळाली आहे. परंतु इतर पिकांना अजूनही पिक विमा मंजूर झालेला नाही. याबाबत शेतकऱ्यांना अजूनही आशा आहे. तसेच धुळे, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात अजूनही सुनवाणी व्हायची आहे. Crop Insurance new

कोल्हापूर, सांगली, परभणी, नागपूर या चार जिल्ह्यातील अंतिम यादीस दोन दिवसाचा वेळ लागणार आहे. धुळे, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील सर्व पिकांना पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, येत्या काही दिवसात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी लवकरच समोर येईल, कृषी विभागाकडे विमा कंपन्यांनी बीड बुलढाणा, वाशिम साठी अपेक्षा नोंदवली आहे.

Leave a Comment