कापूस सोयाबीन अनुदान उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जाहीर झाल्यावर ते देण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ मिळत होती. अखेर आचारसंहितेपूर्वी या अनुदानाला मुहूर्त मिळाला असून, वैयक्तिक खातेदारांना अनुदान जमा होऊ लागले आहे. पुढच्या टप्प्यात सामूहिक खातेदारांचे अनुदान जमा होईल. लाडक्या बहिणीपाठोपाठ लाडक्या भावांनाही अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
विविध आपत्तीमुळे मोठे नुकसान झाल्याने मागील वर्षीच्या खरिपातील कापूस, सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय शासनाने चार महिन्यांपूर्वी घेतला आहे. जिल्ह्यातील एक लाख २६ हजार हेक्टरवरील सोयाबीन व कापूस उत्पादकांना सुमारे ६५ कोटींच्या अर्थसाह्याचा लाभ होणार आहे. कापूस सोयाबीन अनुदानकापूस सोयाबीन अनुदान
जिल्ह्यातील ५ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना या मदतीची लॉटरी लागणार आहे. मागील वर्षी दुष्काळ तसेच घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे खरिपात मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने मदतीचा निर्णय घेतला आहे.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी परंतु दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत दिली जाणार आहे.
शासनाने कापूस उत्पादकासाठी १५४८ कोटी तर सोयाबीन उत्पादकांसाठी २४४६ कोटींची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे अचानकपणे हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना १० हजारापर्यत आर्थिक लाभ होणार आहे.
ई- पीक पाहणी करून सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच याची मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ७८९ हेक्टर सोयाबीन तर ३४ हजार ४५६ हेक्टरवर कपाशीचे क्षेत्र मदतीला पात्र ठरले आहे. त्यानुसार अंदाजे दोन लाखावर शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होईल.
जिल्ह्यातील लाभार्थी असे…
पीक प्रकार शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टर)
सोयाबीन वैयक्तिक १२२१११ ८३६६८
सोयाबीन सामूहिक ३५१८११ ८१२१
कापूस वैयक्तिक ३६३७६ ३२५८१
कापूस सामूहिक २५८४७ १८७५
एकूण दोन्ही ५३६२११ १२६२४५