महिलांना दिवाळी भेट! सरकारकडून मोफत LPG सिलिंडर मिळणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा

भारत सरकारकडून समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये शेतकरी, युवक व महिलांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. अनेक योजना देशातील करोडो लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. दरम्यान, दिवाळी आणि छठपूजा यांसारख्या मोठ्या सणांमध्ये मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेने महिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मोदी सरकारने मोफत LPG सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे.

दिवाळी, छठ यांसारख्या मोठ्या सणांसाठी येथे अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. हा आनंदाचा प्रसंग आहे, म्हणून सरकार अशा प्रसंगी काही भेटवस्तूही देते. अशीच एक भेट मोदी सरकारने महिलांना दिली आहे. याअंतर्गत गृहिणींना मोफत एलपीजी सिलिंडर दिले जाणार आहेत.

केंद्र सरकारची विशेष योजना उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने लागू केली आहे. याअंतर्गत राज्यातील १.८६ कोटी कुटुंबांना मोफत सिलिंडर दिले जाणार आहेत. हा मोफत गॅस प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत दिला जात आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. सरकारच्या माहितीनुसार राज्यातील सर्व महिलांना तीन गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून पहिला हफ्ता सुरु करण्यात आला आहे. ज्या महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही, त्यांना लवकरच पैसे मिळणार असल्याचं समजते. जर तुम्हाला अजूनही हे पैसे मिळाले नसतील, तर तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीत जाऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही केवायसी केलं नाही, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमीच आहे.

कोण लाभ घेऊ शकतो

2016 मध्येच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लागू करण्यात आली. या अंतर्गत महिला सक्षमीकरणाला चालना दिली जात आहे. या योजनेतील पात्र कुटुंबांना एलपीजी सिलेंडर, सेफ्टी नळी, रेग्युलेटर आणि घरगुती गॅस ग्राहक कार्ड दिले जाते. याशिवाय, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर 300 रुपये अनुदानही दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील आणि या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुम्ही या योजनेचे लाभार्थी होऊ शकता. मात्र, त्यात दारिद्र्यरेषेखालील लोकांचाच समावेश आहे. तसेच, त्यांच्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. मोफत LPG सिलिंडर

Leave a Comment